कोल्हापूर :
येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचालित निसर्गमित्र परिवार च्यावतीने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्ष २०२५ व बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मित्राच्या गावाला जाऊया’ हा उपक्रम शनिवारी (दि. १५) आयोजित केला आहे.
या अंतर्गत विविध वयोगटातील शहरी शालेय विद्यार्थ्यांना गावगाड्यातील व्यवसाय जसे की शेती, पशुपालन, तसेच ग्रामीण जीवन यांचा परिचय व अनुभव करून देण्यात येणार आहे. या सहलीमध्ये ग्रामीण शालेय विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत. याद्वारे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नव्या मैत्रीचा धागा जोडण्याबरोबरच, काहीसा विस्मरणात गेलेला “पत्रमैत्री” हा उपक्रम देखिल सुरू करण्यात येणार आहे.
या सहलीत ‘भुदरगड किल्ला’ इतिहास व सध्यस्थिती, किल्ल्याचे महत्व, पाण्याचे व्यवस्थापन, परिसरातील जैवविविधता या विषयी माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भुदरगड परिसरात ‘पाल गावातील पुरातन देवराई’ पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मानवनिर्मित कपीलेश्वर गावातील निसर्गप्रेमींकडून विविध प्रकारचे वृक्ष लावून साकारलेली ‘एकविरा देवी देवराई व हार्बल गार्डन’ पाहण्यास मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी अनिल चौगुले (मो. नं. ९४२३८५८७११) पत्ता- २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, सुभाष रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
——————————————————-
बालदिनानिमित्त ‘मित्राच्या गावाला जाऊया’ उपक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
28 %
4.1kmh
0 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

