कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित वरद पोळने राजस्थानच्या सातव्या मानांकित अपूर्व जैनचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आजचा दिवस गाजवला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या नील केळकरने विवान मल्होत्राचा ७-५, ६-१ असा तर, चौथ्या मानांकित शिवतेज शिरफुलेने तमिळनाडूच्या अश्विन काबिलनचा ६-२, ६-२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या शिवराज जाधवने गुजरातच्या माधव शहाचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळी याने तमिळनाडूच्या नरेश प्रभूचे आव्हान ६-२, ७-६(३) असे मोडीत काढले. महाराष्ट्राच्या वरद उंद्रेने कर्नाटकच्या सिद्धांत वोडेयारवर ६-०, ६-३ असा विजय मिळवला.
——————————————————-
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वरद पोळचा मानांकित खेळाडूवर विजय
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

