Homeशैक्षणिक - उद्योग जिओकडून सर्वांसाठी मोफत 'एआय क्लासरूम' कोर्स सादर

जिओकडून सर्वांसाठी मोफत ‘एआय क्लासरूम’ कोर्स सादर

पर्सनल कॉम्प्युटर, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर कोर्स सहज उपलब्ध
कोल्हापूर :
देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा ‘एआय फॉर एव्हरीवन’ ही संकल्पना मांडली होती, तेव्हा फार कमी लोकांना कल्पना होती की काही महिन्यांतच जिओ ‘एआय क्लासरूम’ फाउंडेशन कोर्स लॉन्च करेल.
चार आठवड्यांचा हा कोर्स पूर्णपणे मोफत असून एआय शिकण्याची आणि आजमावून पाहण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी खुला आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ च्या उदघाटनाच्या दिवशी या कोर्सच्या सुरूवातीची घोषणा करण्यात आली.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात सुपरपॉवर बनविण्याच्या उद्देशाने जिओपीसी आणि जिओ इन्स्टिट्यूट यांनी एकत्र येऊन हा ‘एआय क्लासरूम’ उपक्रम सुरू केला आहे. पर्सनल कॉम्प्युटर, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरणारा कोणताही व्यक्ती हा कोर्स करू शकतो. मात्र प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) केवळ जिओपीसीवरून कोर्स पूर्ण करणाऱ्यांनाच दिले जाईल, तर इतरांना कंप्लीशन बॅज प्रदान केला जाईल. हा कोर्स www.jio.com/ai-classroom या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एआय क्लासरूम कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना विविध एआय टूल्स शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. या कोर्समधून शिकणाऱ्यांना एआयची मूलतत्त्वे जाणून घेण्याबरोबरच आपले अध्ययन व माहिती सुव्यवस्थित ठेवणे, डिझाइन्स, कथा आणि प्रेझेंटेशन्स तयार करणे तसेच समस्या सोडविण्यासाठी एआयचा वापर करण्याचा अनुभव मिळेल.
लॉन्चच्यावेळी रिलायन्स जिओच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाची खरी ताकद म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सशक्त करण्याची क्षमता. जिओ एआय क्लासरूमच्या माध्यमातून आम्ही युवकांना आणि विद्यार्थ्यांना एआय-तयारीकडे नेण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. हा पुढाकार शालेय विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून देईल. आम्ही जिओपीसीच्या सुलभतेचा आणि जिओ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक गुणवत्तेचा वापर एआय शिक्षण सर्वांसाठी पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही मोहीम एआय शिक्षण सर्वांसाठी खुली करून कोणताही विद्यार्थी एआय क्रांतीत मागे राहणार नाही, याची खात्री करेल.
जिओपीसी वापरकर्ते आपल्या होम स्क्रीनवरील डेस्कटॉप शॉर्टकटद्वारे कोर्स सहज सुरू करू शकतात. हा कोर्स मोबाईलवर चालणार नाही. जिओपीसी वापरकर्त्यांना अ‍ॅडव्हान्स्ड एआय टूल्स वापरण्याची परवानगी मिळेल आणि कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना जिओ इन्स्टिट्यूटकडून प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
57 %
3.6kmh
0 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page