कोल्हापूर :
सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) च्यावतीने फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणीस रविवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ए डिव्हिजनच्या (वरिष्ठ गटातील) १६ पैकी ९ संघांनी नोंदणी केली. यामध्ये खेळाडू नोंदणी झालेली नाही.
केएसए ए डिव्हिजन अंतर्गत संघ व खेळाडू नोंदणी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी
पाटाकडील तालीम मंडळ (अ), खंडोबा तालीम मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, संध्यामठ तरुण मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब) आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब या ९ संघांनी नोंदणी केली.
संघ व खेळाडू नोंदणीचा शुभारंभ केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते झाला. यावेळी केएसएचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे – पाटील, दीपक घोडके व संघ नोंदणीसाठी आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
‘केएसए’कडे ९ संघांची नोंदणी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

